जालन्यात मुसळधार; तर सुल्तानी संकटामुळेही शेतकऱ्यांवर संकट, पाहा, येथील शेतकरी काय म्हणाले? - gondegaon jalna heavy rainfall
🎬 Watch Now: Feature Video
जालना - जिल्ह्यासह जालना तालुक्यातदेखील पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. यामुळे जालना तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. शेतात पाणी साचले आहे. तालुक्यातील गोंदेगाव परिसरात पाणी बाहेर निघण्यास जागा नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, कापूस, मोसंबी, द्राक्ष, मका आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. येथील स्थानिक शेतकऱ्यांशी ईटीव्ही भारत प्रतिनिधीने साधलेला संवाद. जालन्यातून जाणारा नागपूर महामार्ग याच गोंदेगाव येथून जात आहे. या महामार्गामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचत आहे. महामार्ग बनविणाऱ्या कंपनीने अर्धवट काम करून शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. येथील स्थानिक शेतकऱ्यांशी ईटीव्ही भारत प्रतिनिधीने साधलेला संवाद.