Mumbai Rain : मुंबईसह राज्यात जोरदार पाऊस ; नागरिक हैराण - Heavy Rain Mumbai

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 1, 2021, 7:29 PM IST

मुंबई - स्वेटर घालू की छत्री घेऊ परिस्थिती सध्या मुंबई निर्माण झाली आहे. डिसेंबर महिना म्हणजेच थंडीचा महिना या दिवसात पावसाने हजेरी लावल्यामुळे मुंबईकरांची दाणादाण ( Heavy Rain Mumbai ) उडाली आहे. अशीच परिस्थिती बाकीच्या मुंबईसह राज्यात पाऊस देखील आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने राज्यात आज मुंबईसह काही भागात आणि उद्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे. आज सकाळपासून मुंबई अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. पूर्व उपनगरात चेंबूर घाटकोपर, सायन याठिकाणी रिमझिम पाऊस पडत आहे त्यामुळे अनेकांची त्रेधातिरपीट उडाली ती या अचानक आलेल्या पावसाने हवामान खात्यानेही पुढील दोन दिवस मुंबई आणि राज्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागाकडून राज्यभरात दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबारसाठी आज ऑरेंज अलर्ट ( Orange alert in 4 districts ) या भागातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.