मुबंई : विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांचे करण्यात आली आरोग्य तपासणी - विक्रोळी पोलीस
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्य हे संकटात आहे. त्यामुळे राज्य सरकारने लॉकडाऊन लावला आहे. यात कडक नियमांची अंमलबजावणी देखील केली आहे. आता मुबंईमधील विक्रोळी विभागात राहणारे डॉ. योगेश भालेराव यांनी विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस बांधवांसाठी प्राथमिक आरोग्य शिबिर घेतले. यात विक्रोळी पोलीस स्टेशनमधील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. यात आजारी पोलिसांना मोफत औषधे उपलब्ध करून देण्यात आली. शिवाय रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक औषधे देखील यावेळी देण्यात आली.