Haribhau Bagade : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय देशासाठी मार्गदर्शक - हरिभाऊ बागडे - भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द
🎬 Watch Now: Feature Video
औरंगाबाद - भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने (SC cancels suspension of 12 BJP Mlas) मागे झाल्याने, हा निर्णय मार्गदर्शक राहील, असे मत माजी विधानसभा अध्यक्ष व भाजप आमदार हरिभाऊ बागडे (Haribhau Bagade) यांनी व्यक्त केले. हा सर्व प्रकार सभागृहाच्या बाहेर घडला होता. त्यामुळे या निलंबनाची गरज नव्हती, तरीही महाविकास आघाडीने हे निलंबन केले होते. सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला हा निर्णय देशातील सर्व विधानसभा अध्यक्ष आणि सभापतींसाठी मार्गदर्शक आहे, असे मत हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केले.