मातृत्व दिन विशेष - मुलासाठी दिव्यांग मातेने केला 1200 किलोमीटरचा प्रवास
🎬 Watch Now: Feature Video
पुणे/अमरावती - देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी करण्यात आली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेला यामधून सुट देण्यात आली आहे. टाळेबंदीमुळे विविध ठिकाणी अडकलेले नागरिक आहे त्याच ठिकाणी अडकून पडले आहेत. अशात एका दिव्यांग महिलेने आपल्या मुलाल घरी आणण्यासाठी विशेष मोटारसायकलवरून (दिव्यांगासाठीची विशेष मोपेड) तब्बल एक हजार दोनशे किलोमिटरचा प्रवास केला. सोनू खंदारे, असे त्या महिलेचे नाव असून त्या पिंपरी-चिंचवडच्या भोसरी परिसरात राहतात. अमरावतीतील कोकर्डा शेंडगाव येथून आपल्या मुलाला आणले. मी आता शाळेत गेल्यावर मला 'हिरकणीचा मुलगा'म्हणतील, अशी भावना त्यांच्या मुलाने 'ईटीव्ही भारत'समोर व्यक्त केली.
Last Updated : May 10, 2020, 9:24 PM IST