Gorsena Aakrosh Morcha : पुसदमध्ये मोर्चेकरांनी केला राष्ट्रवादी आमदार इंद्रनील नाईकांचा विरोध - गोरसेना मोर्चा पुसद
🎬 Watch Now: Feature Video
यवतमाळ - पुसद येथे जमाबंदीचे आदेश झुगारत श्याम राठोड हत्या प्रकरणात आपल्या न्याय मागण्यांसाठी गोर सेनेच्या वतीने महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला गोर सेनेचे मोर्चेकरी हे सहभागी झाले होते. हा मोर्चा वसंतराव नाईक चौकात येऊन त्याचे सभेत रूपांतर झाले. या सभेला राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक मोर्चाला संबोधित करण्यासाठी येत असताना त्यांना मोठ्या प्रमाणात विरोध झाला. यावेळी आमदार इंद्रनील नाईक यांना पोलीस संरक्षणात परत जावे लागले.