ठाण्यातील गणेशभक्ताने साकारला नीरज चोप्राचा रूपातील बाप्पा - नीरज चोप्रा
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे - ठाण्यातील एका गणेशभक्ताने टोक्यो ऑलम्पिक मध्ये भारताला सुवर्ण पदक पटकावून देणाऱ्या नीरज चोप्रा च्या रूपातील बाप्पा साकारला आहे. हातामध्ये भाला असलेली बाप्पाची मूर्ती लक्ष वेधून घेण्यासारखी आहे. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू संजय देशमुख यांच्या निवासस्थानी नीरज चोप्राच्या रूपातील बाप्पा स्थानापन्न झाला आहे. रत्नागिरीतील प्रसिद्ध मूर्तिकार आशिष संसारे यांनी बाप्पाचे हे मोहक रूप साकारले आहे. भक्ती आणि सामर्थ्य दर्शविणारे बाप्पाचे रूप पाहून डोळ्यांचे पारणे फिटते. जगातील सर्वात तरुण देशात गणल्या जाणाऱ्या भारतात स्पर्धात्मक खेळाला आत्ता कुठे बरे दिवस येऊ लागले आहेत. १३५ कोटींचा देश, पण जागतिक स्पर्धांमध्ये पदकांची संख्या मात्र नगण्य अशी आपली अवस्था होती परंतु अलीकडे हे चित्र बदलून लागले आहे ते नीरज चोप्रा सारख्या युवा खेळाडूनी केलेल्या देदीप्यमान कामगिरी मुळे. ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्रा याची कामगिरी प्रेरणादायक ठरावी याकरिता ठाण्यातील गणेश भक्ताने आपल्या घरी भाला फेकणाऱ्या रूपातील गणेशाची स्थापना केली आहे. या या मूर्तीच्या माध्यमातून तरुणांना अनोखा संदेश देण्याचा प्रयत्न मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू संजय देशमुख यांनी केला आहे.