वसईतील सातीवली खिंडीत जंगलाला आग - vasai fire in sativali
🎬 Watch Now: Feature Video
वसई : वसईत जंगलांना आग लागण्याचे सत्र सुरूच आहे. तुंगारेश्वर पाठोपाठ आता सातीवली खिंडीतील जंगलाला शुक्रवारी रात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. वसई पूर्वेतील परिसर हा डोंगराळ भाग असल्याने मोठ्या प्रमाणात येथे जंगलपट्टा आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून येथील विविध ठिकाणच्या भागात जंगलांना आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. शुक्रवारी पुन्हा एकदा सातीवली खिंडीत जंगलाला आग लागली. या आगीची माहिती येथील नागरिकांनी तातडीने महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू केले. दरम्यान, या आगीत मोठ्या प्रमाणात वनसंपदा जळून खाक झाली आहे.