mumbai fire : ह्युंदाईच्या सर्व्हिस सेंटरला भीषण आग; पाहा व्हिडिओ - Powai Police Station
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - साकी विहार रोडवर 'लार्सन अँड टुबरो' (Larsen & Toubro) कंपनीच्या समोर साई ऑटो ह्युंदाईच्या सर्व्हिस सेंटरला आग (Sai Auto Hyundai service center fire) लागली आहे. या घटनेमुळे बाजूच्या महावीर क्लासिक या इमारतीत राहणाऱ्या लोकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाचे (Fire brigade) जवान दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. तसेच पवई पोलीस ठाण्याचे (Powai Police Station) अधिकारी आणि वाहतूक विभागाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. या आगीमुळे आणि नागरिकांच्या (बघ्यांच्या) प्रचंड गर्दीमुळे वाहतूक कोंडीचा देखील सामना करावा लागतो आहे.