...अन्यथा शेतकरी दहा वर्षे उभा राहू शकणार नाही!
🎬 Watch Now: Feature Video
अहमदनगर - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे बाजारपेठ, खरेदी-विक्री, उद्योगधंदे हे सर्व व्यवहार ठप्प आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक शेतकऱयांचा शेतीमाल शेतातच पडून खराब होत आहे. त्यामुळे शेतीला उद्योगांप्रमाणे पॅकेज देण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा शेतकरी दहा वर्षे उभा राहू शकणार नाही, असे मत पद्मपुरस्कार प्राप्त आणि प्रगतशील शेतकरी असलेल्या पोपटराव पवार यांनी व्यक्त केले आहे.