नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत. नरखेड येथील सांगता सभा संपून अनिल देशमुख हे काटोल येथे तीनखेडा- भिष्णूर मार्गानं परत येत असताना काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ काही व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली, असा देशमुखांचा आरोप आहे. दगडफेक कोणी केली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या हल्ल्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
नागपूर येथील रुग्णालयात उपचार : अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचाराचासाठी काटोलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्राथमिक उपचारानंतर देशमुख यांना पुढील उपचारासाठी नागपुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख काटोलमधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपानं चरणसिंग ठाकूर यांना उमेदवारी दिली.
स्वत:च्याच कार्यकर्त्यांकडून दगडफेक : भाजपानं ही 'स्टंटबाजी' असल्याचा आरोप केलाय. "स्वत:च्याच कार्यकर्त्यांकडून अनिल देशमुख यांनी दगडफेक घडवून आणली," असा आरोप भाजपाचे नेते अविनाश ठाकरे यांनी केला. "निवडणुकीत सलील देशमुख हे पराभूत होणार आहेत, याची अनिल देशमुख यांना जाणीव आहे. त्यामुळं सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून घडवून आणलेला हा स्टंट आहे. याचा आम्ही निषेध करतो," असं म्हणत भाजपानं आरोप फेटाळले आहेत. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षानं केला होता.
राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. लोकशाहीचे धिंडवडे उडवले जात आहेत. याचे उदाहरण आज निवडणुकीच्या सांगता सभेवरून घरी परतताना राज्याचे माजी गृहमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यातून समोर आले. या… pic.twitter.com/vo8U3uoqoH
— Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@NCPspeaks) November 18, 2024
कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा : "राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. लोकशाहीचे धिंडवडे उडवले जात आहेत. याचे उदाहरण आज निवडणुकीच्या सांगता सभेवरून घरी परतताना अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यातून समोर आलं. या घटनेचा जाहीर निषेध करण्यात येत आहे," अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षानं दिली.
गृहमंत्री फडणवीस यांच्या नागपुरात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्याड खुनी हल्ला झाला.
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 18, 2024
फडणवीस आपली यावर काय प्रतिक्रिया आहे?
हा राजकीयहल्ला आहे.मुंबईत माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या होते आणि नागपुरात माजी गृह मंत्र्याला ठार मारण्याचा प्रयत्न होतो.
शेम! शेम!
pic.twitter.com/zgEi7pJuOw
गुंडांना मोकळं रान मिळालं : "अनिल देशमुखांवर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला. ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. आम्ही सर्वजण या हल्ल्याचा निषेध करतो. निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीनं हल्ला करणारी मानसिकता या राज्यात कधीही नव्हती. हे राज्य लोकशाही विचारांना मानणारं राज्य आहे. पण भाजपाच्या काळात राज्यातील विशेषतः नागपूर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची दुर्दशा झाली असून, गुंडांना मोकळं रान मिळालं आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन देशमुख यांच्यावर हल्ला करणारे हल्लेखोर आणि त्यांचे मास्टरमाईंड समोर आले पाहिजेत, ही आमची मागणी आहे," अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आ. अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या मी तीव्र निषेध करतो.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) November 18, 2024
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यात एका माजी गृहमंत्र्यांवर प्राणघातक हल्ला होतो यावरून राज्यात कायद्याचे राज्य आहे… pic.twitter.com/9VNOuzJA5a
हेही वाचा