जालना : दुधना नदीच्या पुलावरील कठड्याला गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या - Dudhna river bridge suicide news
🎬 Watch Now: Feature Video
जालना - जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील रोहिणा पुलावर एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. परतूर-वाटूर रोडवर असलेल्या रोहिणा गावाजवळील दुधना नदीच्या पुलावरील कठड्याला गळफास घेऊन या शेतकऱ्याने आत्महत्या केली. निवृत्ती पितळे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तो परतूर तालुक्यातील रोहिणा गावचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. तसेच पोलिसांना याची माहिती दिली त्यानंतर परतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.