'देशात प्रशासन असतानाही देश राम भरोसे' - महाविकास आघाडी सरकार
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - या देशात सरकार, प्रशासन, प्रधानमंत्री, आरोग्यमंत्री आहेत. पण ज्याप्रकारे मृत्यू होत आहेत, गंगा नदीत हजारोंच्या संख्येने मृतदेह मिळत आहेत, हाहाकार माजला आहे, ते पाहता देश रामभरोसे आहे, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्राची प्रतिमा खराब करण्याचे काम विरोधकांनी केले आहे. मात्र कोरोनाकाळात सर्वात जास्त चांगले काम महाराष्ट्राने केले आहे. राजकारण बाजूला ठेवून जर चर्चा केली, तर देशातील परिस्थिती सुधारु शकते. असा सल्लाही संजय राऊतांनी दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली देशात महाराष्ट्राने उत्तम काम केले आहे. त्यामुळे कोणताच अहंकार न बाळगता महाराष्ट्र मॉडेल देशात लागू करायला हवे होत. मला जीशान सिद्दिकी बाबत कल्पना नाही, जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, ते महाविकास आघाडीचे महत्त्वाचे मंत्री आहेत, अनुभवी नेते आहेत. त्यांनी काल स्वतः पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत अत्यंत महत्वाचा खुलासा केला आहे. कॅबिनेट मध्ये काय घडलं? याबाबत बाहेर सांगू शकत नाही. कितीही कोणीही अफवा पसरविल्या तरी महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे, मजबूत आहे. कॅबिनेटमध्ये भांड्याला भांडे लागले असेल, पण आमची भांडी काचेची नाही. ती फुटणार नाही किंवा त्याला तडा जाणार नाही, असेही ते म्हणाले.