अगोदर महा 'शिव' आघाडी..आता महा 'विकास' आघाडी... - काँग्रेस
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई - राज्यात शिवसेना आणि आघाडीचे सरकार स्थापनेचं इंजिन आता ट्रॅकवर आल्याचं दिसत आहे. दिल्लीत पवारांच्या निवासस्थानी दोन्ही काँग्रेस नेत्यांची 'दिलसे' चर्चा झाल्यानंतर, राज्यात आता महाविकासआघाडीचं सरकार येईल, असंच दिसत आहे. दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून मात्र 'आम्ही चर्चाच करतोय' असं सांगितलं जात असलं तरीही 'सेना-आघाडीत'.. 'आमचं ठरलंय' हा सुर जुळताना दिसतोय...
Last Updated : Nov 22, 2019, 11:21 PM IST