Corona Bulletin : राज्यातील कोरोना संदर्भातील घडामोडींचा वेगवान आढावा
मुंबई - राज्यात सातत्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. शुक्रवारी राज्यात कोरोना रुग्णसंख्येने दहा हजारांचा नवा उच्चांक गाठला. तर मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी अकराशेच्या वर नव्या रुग्णांची नोंद झाली. कोरोना नियंत्रणासाठी गौरविलेल्या धारावीमध्येही पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे आता आर्थिक राजधानी पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर उभी असल्याचे चित्र यातून दिसून येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ईटीव्ही भारतने राज्यातील परिस्थितीचा घेतलेला आढावा.