एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याने बदलणार उत्तर महाराष्ट्राचे राजकारण - खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश
🎬 Watch Now: Feature Video
जळगाव - एकनाथ खडसे यांनी बुधवारी भाजपचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याने जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली. खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यासाठी ते आज मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मुंबईकडे रवाना होणार आहेत.
खडसे यांच्या राजीनामा हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर उत्तर महाराष्ट्रातील राजकीय गणीते बदलणार असून राष्ट्रवादीची ताकद आता वाढणार आहे. तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना याचा फायदा होणार आहे. याबाबत ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी प्रशांत बधाने यांनी घेतलेला आढावा...