Union Budget 2022 : आरोग्याच्या सुविधा गरीब आणि गरजूपर्यंत पोहचतील ही अपेक्षा - डॉ. सुनिता दुबे
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन ( Nirmala Sitharaman on budget 2022 ) यांनी आज संसदेत सन 2022- 23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प ( Union Budget 2022 ) सादर केला आहे. हेल्थ फॉर ऑल हे भविष्यासाठी चांगले आहे. मात्र, डिजिटल हेल्थ डिजिटलायझेशनच्या माध्यमातून आरोग्याच्या सुविधा गरीब आणि गरजूपर्यंत पोहचतील, अशी अपेक्षा व्यक्त करत अर्थसंकल्पाचे आरोग्यासाठी काम करणाऱ्या मेडस्केप इंडिया आणि व्ही डॉक्टर कॅम्पेनच्या अध्यक्षा डॉ. सुनिता दुबे यांनी स्वागत केले आहे. सादर झालेल्या अर्थसंकल्पात सामान्य नागरिकांना काहीही मिळालेले नाही. त्यांना आयकरमध्ये सवलत मिळालेली नाही. क्रिटिकल केअर आणि ट्रेनिंगसाठी या अर्थसंकल्पात काहीही नाही. तरीही भविष्यासाठी चांगले बजेट आहे. देशातील सर्व राज्यांवरील सरचार्ज माफ केला आहे. यामुळे राज्यसरकार हा निधी आरोग्य सेवा पुरवण्यासाठी उपयोग केला जाऊ शकतो, अशी अपेक्षा दुबे यांनी व्यक्त केली आहे.