मुलांनी पार्टीत थोडीफार दारू घेतली तर काय झालं? महिला आमदार संतापल्या; व्हिडिओ व्हायरल - मीना कंवर यांचा व्हिडिओ व्हायरल
🎬 Watch Now: Feature Video
जोधपुर - गेल्या 5 दिवसांत रतानाडा पोलीस स्टेशन पुन्हा एकदा चर्चेत आहे. या पोलीस स्टेशन परिसरात शेरगढच्या आमदार मीना कंवर यांच्या कुटुंबातील मुलाला रविवार (दि.17)रोजी रात्री दारूच्या नशेत गाडी चालवताना पोलिसांनी पकडले. त्यानंतर त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. यानंतर आमदार मीना कंवर आणि त्यांचे पती प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य उमेद सिंह हे रातनाडा पोलीस स्टेशनमध्ये पोरचले. दरम्यान, मुलं आहेत ती, त्यांनी पार्टी केली. त्यामध्ये थोडीफार दारु पीले असतील. मग काय तुम्ही त्यांना अटक करणार? अस म्हणत मीना कंवर आणि पती उमेद सिंह यांनी पोलीस स्टेशनमध्येचं ठाण मांडले. दरम्यान, या दोघांची आणि पोलसीस कॉन्स्टेबलमची शाब्दीक चकमक झाली, ती व्हिडिओत कैद झाली आहे. तो व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
Last Updated : Oct 19, 2021, 1:29 PM IST