भुताटकीसारखे शब्द वापरणे म्हणजे पोरखेळ - देवेंद्र फडणवीस - देवेंद्र फडणवीस नागपूर विधानपरिषद आमदार प्रकरण
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने राज्यपालांकडे विधान परिषदेवर नामनियुक्त करण्यासाठी 12 सदस्यांची शिफारस केली आहे. नामनिर्देशन सदस्यांची यादी कुठे आहे, याबद्दल राजभवनच माहिती देऊ शकते. हा विषय गंभीर असल्यामुळेच ते न्यायप्रविष्ट देखील आहे. त्यामुळे नावांची यादी असणारी फाईल गायब झाली, असे म्हणत भुताटकीसारखे शब्द वापरणे चुकीचे असल्याचे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. संजय राऊत यांना दुसरे कोणतेही काम नाही ते दिवसभर अशाच गोष्टी करत असतात. त्यांच्या अशा वक्तव्यांना आम्ही उत्तर देत नसल्याचे देखील फडणवीस म्हणाले. तर मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून छत्रपती संभाजी राजे महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहेत. ते मलादेखील भेटणार असून आम्ही २८ मे रोजी भेटू, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. ते नागपूर येथे बोलत होते.
Last Updated : May 25, 2021, 10:27 AM IST