दानापूर दलित अत्याचार प्रकरण : काँग्रेसच्या माजी आमदाराच्या सांगण्यावरूनच सोयाबीनची गंजी पेटवल्याचा आरोप - Danapur Atrocity allegations Virendra Jagtap

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 25, 2021, 3:57 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील दानापूर गावातील दलित समाजाच्या लोकांवर होत असलेल्या अन्यायामुळे शंभर दलित बांधवांनी गाव सोडून गावाच्या बाजूला असलेल्या तलावाजवळ मुक्काम मांडला होता. गावातील काही सवर्ण नागरिक त्रास देत असल्याचा आरोपही या दलित बांधवांनी केला होता. शेतात जाण्याचा वहिवाटीचा रस्ता गावकऱ्यांनी बंद केला असून सोयाबीनची गंजी पेटवल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल गृहमंत्र्यांनी घेतल्यानंतर हे दलित बांधव पुन्हा गावी परतले होते. दरम्यान, काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या सांगण्यावरूनच दलित बांधवांची सोयाबीनची गंजी पेटवल्याचा खळबळजनक आरोप ऑल इंडिया पॅथर सेनेच्या दीपक केदार यांनी केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यावरही अट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी दीपक केदार यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.