सुळेवाडीचा ढाण्या वाघ..! 12 किलो वजनाच्या चपला वापरणारे भारदस्त व्यक्तिमत्व दाजी नाना.. - पिलीव बातमी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-11005642-thumbnail-3x2-sur.jpg)
पंढरपूर (सोलापूर) - जगामध्ये हौसेला मोल नाही, असे म्हणतात. त्यातच व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात, एखाद्याचा वेगळा छंद त्या व्यक्तीची ओळख बनवून जातो. त्याचाच परिचय माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी येथील रहिवासी असणारे दाजी आनंत दोलतोडे यांच्या बाबतीतही येतो. दाजी दोलतोडे हे त्यांच्या वजनदार चपलेमुळे ओळखले जातात. कारण म्हणजे दाजी ज्या चपला वापरतात, त्या चपलेचे वचन तब्बल बारा किलो आहे. या वजनदार चपला वापरण्याचा छंद दाजींनी जोपासला आहे. दाजी दोलतोडे यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वला शोभणाऱ्या चपला शोले स्टाईल म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या या वजनदार चपलांनी दाजींना समाजामध्ये एक ओळख निर्माण करून दिली आहे.