'दगड' प्रदर्शनातून भूगर्भिय बदल अन् मानवी स्वभावाची सांगड घालण्याचा प्रयत्न - मानवी स्वभावाची सांगड घालण्याचा प्रयत्न
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - जगातील भूगर्भिय बदलांवर कलात्मकरित्या प्रकाश टाकण्याचे काम मुळचा सातारा जिल्ह्यातील सध्या गिरणगावात राहणाऱ्या मेटल वर्क आर्टिस्ट स्वप्निल गोडसे याने केले आहे. जहांगीर आर्ट गॅलरीत ( Jehangir Art Gallery of Mumbai ) सुरू झालेल्या ‘दगड’ या प्रदर्शनात लोखंड, स्टील आणि तांबे या धातूंच्या मदतीने त्याने विविध कलाकृतींमधून भूगर्भिय बदल आणि मानवी स्वभावाची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे या दगडामधील जीवसृष्टीचे चिंतन आणि मनन करून त्यामागील सौंदर्यदृष्टी स्वप्निलने त्याच्या कलाकृतीतून मांडली आहे. दगडाचा प्रवास दाखवताना स्वप्निलने साकारलेली धातूची रिक्षा सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी येणारे प्रेक्षक हे रिक्षासमोर उभे राहू सेल्फी घेताना दिसत आहे. हे प्रदर्शन सोमवार ( दि. 27 डिसेंबर) पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 7 यावेळेत सर्वसामान्य नागरिकांना प्रदर्शन पाहण्यासाठी मोफत प्रवेश ठेवण्यात आला आहे.