VIDEO : क्रिकेटर पृथ्वी शॉ साई चरणी नतमस्तक; कोरोनाचे संकट दूर करण्याची केली प्रार्थना - साईबाबांच्या समाधीचे दर्शन
🎬 Watch Now: Feature Video
अहमदनगर - शिर्डी साईबाबांचे परमभक्त आणि भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज पृथ्वी शॉ याने शिर्डीत येवुन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतलं आहे. यावेळी साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानाईत यांनी पृथ्वी ला पुष्पगुच्छ आणि साईबाबांची विभूती देऊन सत्कार केला. साईबाबांच्या दर्शनानंतर पृथ्वीने माध्यमांशी संवाद साधला. साई बाबांवर माझी नितांत श्रद्धा असून आवर्जून दर्शनाला येत असल्याचे त्याने सांगितले. अनेक दिवसापासुन साईबाबांच्या दर्शनासाठी येण्याची इच्छा होती. मात्र कोरोनामुळे साई मंदिर बंद होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास सुरूवात झाल्याने कोरोनाचे नियम पाळत साईबाबांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आणि लगेचच साईबाबांचा दर्शनासाठी शिर्डीत आलो. कोरोनाचा प्रादुर्भाव जरी कमी झाला असला तरी कोरोनाचे संकट अजूनही संपले नाही. त्यामुळे आपण सर्वांनी आपली काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. देशावरील कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर होवो, यासाठी साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली आहे. तर विश्वचषकात झालेल्या भारताच्या पराभवाबद्दल विचारले असता. हे क्रिकेट आहे. चालत राहणार कुठे थांबणार नाही, असेही यावेळी पृथ्वी शॉ म्हणाला.