VIDEO : शेतातील शेडमध्ये ठेवलेल्या कापसाला आग; वाशिमधील घटनेत लाखो रुपयांचे नुकसान - Cotton fire Washim news
🎬 Watch Now: Feature Video
वाशिम - जवळा (कु) येथील शेतकरी वसंता बाबाराव चिखलकर यांच्या शेतातील टिनाच्या शेडमध्ये ठेवलेल्या कापसाच्या गजीला (cotton fire in farm) अज्ञात इसमाने आग लावल्याची घटना घडली. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत टिनाच्या शेडसह कापूस जाळून खाक झाला. या आगीत शेतकऱ्याचे 1 लाख 60 हजार रुपयांचे नुकसान झाले.