पुणे : प्रत्यक्ष कोरोना लसीकरणाला सुरुवात - पुणे कोरोना लसीकरण न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना महामारी विरोधात आज भारतात महत्त्वपूर्ण पाऊल पडत आहे. अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या प्रत्यक्ष कोरोना लसीकरणाला आजपासून सुरुवात होत आहे. पुण्यातही आठ केंद्रांवर या लसीकरणाला सुरवात होत आहे. प्रत्येक केंद्रावर 100 आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष लस दिली जाणार आहे. पुण्यातील कमला नेहरू रुग्णालायतील कोरोना लसीकरणाची तयारी आणि ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे त्या कर्मचाऱ्यांशी आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी संवाद साधला आहे.