'गरिबांनी मरावं अन् श्रीमंतांनी जगावं, असे मोदी सरकारला वाटते' - nana patole
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-11956957-389-11956957-1622386965237.jpg)
मुंबई - आधी आजार द्यायचा मग सत्कार करायचा ही भाजपची दुटप्पी भूमिका आहे. कोरोनावर वेळीच उपययोजना केले असते तर अनेकांचे जीव वाचले असते. पण, मोदी सरकारने टाळ्या-थाळ्या वाजवून देशवासीयांना अंधश्रद्धेच्या खाईत लोटले होते. असे केंद्र सरकारने का केले, असा सवाल करतानाच सूट बुटाच सरकार म्हंटल्यावर भाजपला त्रास झाला. पण, पंचतारांकित हॉटेलमध्ये लसीकरणाची भूमिका ही भाजपची आहे. गरिबांनी मरावं आणि श्रीमंतांनी जागावं असे मोदी सरकारला वाटत असेल, अशी टीका काँग्रेसच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.