विधानपरिषदेत भाजपच्या 'त्या' दोन वादग्रस्त आमदारांची मुख्यमंत्र्यांकडून झाडाझडती - cm uddhav thackeray speech
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मतांच्या स्वार्थी राजकारणासाठी पाहिजे ती मुलगी पळवून आणतो, अशी वल्गना व सैनिकांविषयी वल्गना करणाऱ्यांसारखे ढोंगी जगात दुसरे कोणीही नाही. राजकारणात हरलो तर चालेल पण महिलांचा अपमान करणारा एकही नतदृष्ट पक्षात ठेवणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिलांचा उपमर्द करणाऱ्या प्रवृत्तींचा कठोर शब्दात समाचार घेतला. जागतिक महिला दिन दरवर्षी येईल पण नुसत्या चर्चा नको. पक्ष राजकारणापलीकडे जाऊन चांगला समाज घडवण्यासाठी नतदृष्टांचा माज उतरवण्याची जबाबदारी तुमची-आमची सर्वांची असून, महिलांचा आदर सन्मान प्रामाणिकपणे करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी विधानपरिषदेत केले.