CCTV : बुलडाणा अर्बन बँकेच्या शहागड शाखेवर दरोडा; एक कोटीचा मुद्देमाल लंपास - जालना दरोडा बातमी
🎬 Watch Now: Feature Video
जालना - शहागड येथील बुलडाणा अर्बन पतसंस्थेवर आज संध्याकाळच्या सुमारास दरोडा पडला आहे. बंदूक घेऊन आलेल्या दरोडेखोरांनी हा दरोडा टाकला. यात 25 लाख रुपये रोख रकमेसह लॉकरमधील 70 लाखांचे गहाण ठेवलेले संपूर्ण सोने दरोडेखोरांनी लुटून नेले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.