अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी - Arnab Goswami Bail update
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - वास्तुरचनाकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केली. अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.एस शिंदे व एस.एम कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान अर्णब गोस्वामी यांच्यातर्फे वकील हरीश साळवे व आबाद पोंडा यांनी युक्तिवाद केला होता. गोस्वामी यांची अटक कायद्याच्या चौकटीत बसत नसल्याचा युक्तिवाद या दोघांनी केला होता. यानंतर न्यायालयाने यासंदर्भात राज्य सरकार व अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांची बाजू जाणून घेणे महत्वाचे असल्याचे म्हटले होते.