VIDEO : 'चंद्र'शेखर बावनकुळेंवरचे दिल्लीतील नाराजीचे ग्रहण सुटले - चंद्रशेखर बावनकुळे विधान परिषद उमेदवारी
🎬 Watch Now: Feature Video

नागपूर - केंद्रातील नाराजीमुळे विधानसभेत डावलल्या गेलेल्या माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (bjp leader chandrashekhar bawankule) यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज संस्थेचे उमेदवारी (lesislative council ticket) ही केंद्रातील नाराजी दूर करण्यात यशस्वी झाल्याने मिळाली असल्याचे बोलले जात आहे. तर काँग्रेसकडून उमेदवार म्हणून माजी मंत्री राजेंद्र मुळक (rejendra mulak) यांचा नाव आघाडीवर असून लवकरच याची घोषणा होईल, असे पक्षातील नेतेमंडळीकडून सांगितले जात आहे. बावनकुळेंना उमेदवारी मिळाल्यानंतर या सर्व पार्श्वभूमीवर बावनकुळेंशी ईटीव्ही भारत प्रतिनिधीने संवाद साधला. पाहा, ते काय म्हणाले?
Last Updated : Nov 21, 2021, 5:17 PM IST