शेतीपंपाची तोडलेली वीज पुन्हा जोडण्याच्या मागणीसाठी वाशिममध्ये भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा रास्तारोको - भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा रास्तारोको
🎬 Watch Now: Feature Video
वाशिम - शेतीपंपाची तोडलेली वीज पुन्हा जोडावी, यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेने रास्तारोको केला. अधिवेशनात सरकारकडून विज कापणी थांबवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, अधिवेशन संपताच पुन्हा विज कापणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारने दुटप्पी भूमिका न घेता विज कापणी थांबवावी, अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे. तसेच विजेची थकबाकी पूर्णपणे माफ करण्यात यावी आणि तोडलेली विज पुन्हा जोडून देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
TAGGED:
वीज बिल तोडणीविरोधात आंदोलन