पुत्रदा एकादशीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट - आळंदी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12805862-818-12805862-1629261700952.jpg)
आळंदी (पुणे) - पुत्रदा एकादशी निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात पहाटे समाधीवर दुग्धअभिषेक करत महाआरती करण्यात आली. विना मंडपात व समाधी मंदिर (गाभाऱ्यात) विविध रंगाच्या फुलमाळांनी सजविण्यात आलं आहे. समाधी मंदिरातील दृश्य अत्यंत विलोभनीय असून प्रत्येक विशेष दिनानिमित्ताने माऊलींच्या गाभाऱ्याला फुलांची आकर्षक सजावट केली जाते. माऊली मंदिरात केलेली ही सजावट पाहण्यासाठी दरवर्षी असंख्य भाविक याठिकाणी दाखल होत असतात. परंतु यावर्षी कोरोनाचं सावट असल्यामुळे यंदा भाविकांना घरातूनच ऑनलाइन दर्शन घ्यावं लागत आहे. देवस्थानं बंद असले तरी मंदिरांमध्ये पूजा, फुलांची आरास अशा विधी नित्यनेमाने सुरू असल्याची माहिती देवस्थानचे व्यस्थापक माऊली वीर यांनी दिली.