गणपती आगमनाच्या मुहुर्तावर एकाच वेळी 21 शेतकऱ्यांनी खरेदी केले 21 ट्रॅक्टर - एकाच वेळी 21 शेतकऱ्यांनी खरेदी केला ट्रॅक्टर
🎬 Watch Now: Feature Video
पंढरपूर (सोलापूर) : श्रीगणेशाचे आगमन मोठ्या थाटामाटात, उत्साहात झाले. याच चांगल्या मुहूर्तावर पंढरपूर तालुक्यातील डिव्हीपी उद्योग समूह समृद्धी ट्रॅक्टर्समधून तब्बल २१ शेतकऱ्यांनी एकाच वेळी २१ सोनालिका ट्रॅक्टर्सची खरेदी केली. भव्य रॅली काढून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर देण्यात आले. पंढरपूर शहरातील सरगम चौक, सावरकर चौक, स्टेशन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भोसले चौक येथून शेतकऱ्यांनी भव्य रॅली काढली. धाराशिव कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या हस्ते २१ शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. समृद्धी ट्रॅक्टर्सच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी हिताच्या विविध योजना राबवल्या जात आहेत. दरम्यान, लकी ड्रॉची सवलत एक महीना वाढवण्यात आल्याने इतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.