अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी विशेष : 'एकजुटीचा नेता झाला'

By

Published : Aug 1, 2020, 6:41 AM IST

Updated : Aug 1, 2020, 2:11 PM IST

thumbnail
औरंगाबाद - कष्टकऱ्यांच्या चळवळीत आपल्या शाहिरीने प्रबोधन करणारे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या नवनिर्मितीमध्ये मोलाचे योगदान देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जन्मशताब्दी. कथा, कादंबऱ्या, लोकनाट्य, चित्रपट, पोवाडे, लावण्या, प्रवासवर्णन, इ. अनेक साहित्यप्रकार आण्णाभाऊंनी हाताळले. यासोबतच अण्णांची चळवळीची गाणी आणि आंदोलनात जोश भरणारे लोकशाहीर म्हणून असलेली त्यांची प्रतिमा कायमच समाजाला प्रेरणा देत राहील. औरंगाबाद येथील शाहीर समाधान इंगळे आणि त्यांच्या परिवाराने आण्णा भाऊंच्या जन्मशताब्दी निमित्ताने 'ईटीव्ही भारत'च्या जग बदल घालूनी घाव या मालिकेच्या माध्यमातून सहभाग घेतला. यावेळी त्यांनी आण्णाभाऊंच्या वेगवेगळी गीते सादर केली.
Last Updated : Aug 1, 2020, 2:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.