Amit Shah on Ram Temple Issue : राम मंदिर, कलम 370 वरुन अमित शहांनी दिले विरोधकांना प्रतिउत्तर - अमित शहा पुणे दौरा

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 19, 2021, 8:08 PM IST

पुणे - येथील भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात ( BJP Workers Meet ) केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी ( Union Home Minister Amit Shah ) राम मंदिराचे दिलेले वचन, ३७० कलम हटवण्याचे आश्वासन पूर्ण केल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शाह म्हणाले, 'राम मंदिर वही बनाएंगे, मगर तिथी नही बताएंगे' अशी टीका आमच्यावर उत्तर प्रदेशातील नेत्यांकडून होत होती. मात्र आज मला येथून मुलायम सिंह यादव, ( Mulayam Singh Yadav ) बहन मायावती ( Mayawati ) आणि अखिलेश यादव ( Akhilesh Yadav ) यांना सांगायचे आहे, की राम मंदिर तयार होत आहे. जिथे ठरले होते, तिथेच तयार होत आहे. ही २०१९ मध्ये तुम्ही दिलेली ताकद आहे. त्या जोरावर आपल्या नेतृत्वाने हे निर्णय घेतले आहेत, असेही शहा म्हणाले. ३७० कलम केव्हा हटवले जाईल, असा सवाल २०१४ मध्ये मिळालेल्या पूर्ण बहुमतानंतर आम्हाला विचारला जात होता. त्याचे उत्तर २०१९ मध्ये नरेंद्र मोदींनी दिले आहे. ५ ऑगस्ट २०१९ ला ३७० कलम संविधानातून उखडून फेकण्यात आले. आता काशी विश्वनाथ येथे भव्य मंदिर तयार झाले आहे. हे सर्व भाजपा कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे झाल्याचे मतही अमित शाह यांनी यावेळी मांडले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.