लॉकडाऊन अजून पंधरा दिवस वाढवण्यात येणार असल्याचे अमित देशमुखांचे संकेत - लॉकडाऊन बद्दल बातमी
🎬 Watch Now: Feature Video
आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत 18 ते 44 वयोगटापर्यंतच्या लोकांना सुरू होणार्या लसीकरण मोहिमेत मोफत लस दिली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील नागरिकांना मोफत लसीकरण करण्यात यावे यासाठी सर्व मंत्र्यांनी एकमताने निर्णय घेतला असून या लसीकरणासाठी लागणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही. लसीकरण मोहिमेसाठी साडेसहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. एक मेपर्यंत असलेला लॉकडाऊन अजून पंधरा दिवस वाढवण्यात येणार असल्याचे संकेत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी...