नांदेड-यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरील सहस्त्रकुंड धबधब्याचा रुद्रावतार... - nanded rain 2020 news
🎬 Watch Now: Feature Video
नांदेड - यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर असलेला सहस्त्रकुंड धबधबा आक्राळ-विक्राळ रूप धारण करून कोसळू लागला आहे. गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे व बुलढाणा जिल्ह्यात नदीला पूर आल्याने धरणाचे पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे, विदर्भ-मराठवाडा सीमेवरील पैनगंगा नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेला सहस्त्रकुंड धबधबा तिन्ही दारांनी ओथंबून वाहत आहे. धबधब्याला सध्या रुद्रावतार रूप प्राप्त झाले आले आहे. मात्र, कोरोना महामारीमुळे सहस्त्रकुंड धबधबा परिसरात पर्यटकांना प्रशासनाकडून प्रवेशबंदी करण्यात आली आहे.