Vikram Gokhale on Kangana : ...म्हणून कंगना काहीही चुकीचं बोलली नाही असं मी म्हणालो - विक्रम गोखले - विक्रम गोखले न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - अभिनेत्री कंगना रणौतची(Kangana Ranaut) बाजू घेतल्यामुळे प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले(Actor Vikram Gokhale) यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली होती. यासर्व प्रकरणावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माझी कंगनाशी ओळख नसली, तरी राजकीय अभ्यासाशी माझी चांगली ओळख आहे. मी जे बोललो त्यामागे माझीही काही कारणं आहेत. ती आता सांगत बसत नाही. १८ मे २०१४ रोजीचा गार्डियनचा अंक वाचा. जे गार्डियनने म्हटलंय, तेच कंगनाने म्हटलंय. त्याची कॉपी माझ्याकडे आहे. त्यामुळे कंगना काहीही चुकीची बोलली नाही असं मी म्हणालो. त्यावरून ताबडतोब बोंबाबोंब सुरू झाली, असे विक्रम गोखले म्हणाले.