मदर्स डे विशेष: अवघ्या 8 महिन्याच्या चिमुकलीला घरी सोडून 'ती' करतीये गावचा सर्वे....
🎬 Watch Now: Feature Video
बीड - कोरोना विषाणूच्या संकटामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण आहे.प्रत्येकजण आपापल्या घरात बसून अदृश्य विषाणूशी लढा देत आहे. मात्र, बीडमध्ये आशा वर्कर म्हणून काम करणाऱ्या एका हिरकणीने 8 महिन्यांची चिमुकली मुलगी असताना देखील कर्तव्य म्हणून कोरोनाच्या युद्धात उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला. मुलगी आजारी असताना मुलीची जबाबदारी जाऊबाईवर सोपवून आशा वर्करने कर्तव्य श्रेष्ठ मानत गावात सर्वे केला. सुनिता बोराडे असे त्यांचे नाव आहे.