नवी मुंबईतील एपीएमसी फळ मार्केटमध्ये क्षुल्लक कारणावरून व्यापाऱ्याला मारहाण - APMC letest news

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 23, 2021, 4:42 PM IST

नवी मुंबई - एपीएमसी फळ मार्केटमध्ये क्षुल्लक कारणामुळे जोरदार हाणामारी झाली. ओपन शेडमध्ये अनधिकृत आंबा व्यापारासाठी जागा न दिल्याने एका व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एपीएमसी मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला मुक्त शेड बांधण्यात आले आहे. या शेडमध्ये काही लोकांना आंब्याचा व्यापार करायचा होता. मात्र, अनधिकृत आंबा व्यापारासाठी जागा न दिल्याने एका व्यापारास चक्क 10 ते 15 जणांकडून मारहाण केली गेली. मारहाणीत व्यापारी गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर एपीएमसी मार्केट पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र त्याआधीच मारहाण करणारी टोळी पळून गेली. पोलिसांनी जमावाला बाजूला केले व वाशी येथील महापालिका रुग्णालयात व्यापाऱ्याला रुग्णालयात दाखल केले आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.