पंढरपुरातील 'या' व्यक्तीने पर्यावरणाच्या संगोपनासाठी तीन लाख बीज गोळे केले वाटप - पंढरपूर बातमी
🎬 Watch Now: Feature Video
पंढरपूर (सोलापूर) - 5 जून हा पर्यावरण दिन म्हणून जगभरात साजरा केला जात असतो. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून काही निसर्गप्रेमी व मंडळी निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या वृक्षारोपणाचा कार्यक्रम साजरा करतात. मात्र, एका दिवसांनी वृक्ष लागवड केल्याने प्रदूषणात घट होते का, असा प्रश्न अनेकांना पडतो. पंढरपूर शहरातील एकाने निसर्गाच्या प्रेमासाठी आतापर्यंत तीन लाख बीज गोळे व 12 हजार रोपांचे वाटप करण्यात आले आहे. पंढरपूर शहरात राहणाऱ्या आनंद नगरकर यांनी गेल्या 13 वर्षांपासून निसर्गाच्या वृक्षसंपदाला वाढविण्याचे काम केले आहे.