बुलडाणा : घरगुती वादाच्या रागातून व्यक्ती चढला तीनशे फुट उंच टॉवरवर - बुलडाणा जिल्हा बातमी
🎬 Watch Now: Feature Video
बुलडाणा - शहरात असलेल्या सुमारे तीनशे फुट उंच बीएसएनएलच्या टॉवरवर एक व्यक्ती घरगुती वादाच्या रागातून चढली होती. दरम्यान, या ठिकाणी बघ्यांंची मोठी गर्दी उसळल्याने पोलिसांची मोठी दमछाक होत होती. संजय लक्ष्मण जाधव (रा. मिलिंद नगर, बुलडाणा), असे टॉवरवर चढणाऱ्याचे नाव आहे. घरगुती वादातून रागाच्या भरात तो टॉवरवर चढला होता. अथक परिश्रमानंतर प्रशासनाने त्याला रात्री सुमारे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास खाली उतरविले आहे.