VIDEO : आरे कॉलनीतून बिबट्याला पकडले

By

Published : Oct 15, 2021, 8:56 PM IST

thumbnail
मुंबई : मुंबईच्या आरे कॉलनी युनिट 13 मधून शुक्रवारी पहाटे 4 च्या सुमारास आणखी एक बिबट्या पकडला गेला. वनविभागाच्या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की तो हल्ला करणारा बिबट्या आहे की नाही हे सांगणे सध्या कठीण आहे. आतापर्यंत वन विभागाने 2 बिबट्यांना पकडले आहे. पकडलेल्या बिबट्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आले आहे. गेल्या 2 महिन्यात बिबट्याने 9 हल्ले केले आहेत. आरे कॉलनीमध्ये बिबट्याची दहशत इतकी वाढली आहे की अंधार पडताच लोक स्वतःला घरात कोंडून घएतात आणि वस्त्यांमध्ये शांतता पसरते. अलीकडेच एका १४ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. याआधी एका वृद्ध महिलेचे बिबट्याशी लढा देत असल्याचे चित्रही समोर आले होते.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.