अनोखा लग्नसोहळा, आजी-आजोबा बोहल्यावर; पाहा VIDEO - old couple marrige in sangli
🎬 Watch Now: Feature Video

सांगली - मिरजेत एक अनोखा लग्नसोहळा पार पडला आहे. 66 वर्षांची वधू आणि 79 वर्षांचे वर बोहल्यावर चढले आहेत. मात्र, हा लग्नसोहळा सुखीसंसारासाठी नव्हे तर आयुष्याच्या सरते शेवटी दोघांनाही जगण्यासाठी एकमेकांचा आधार मिळावा म्हणून झाला आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्या बेघर केंद्रात निराधार असणाऱ्या वृद्ध महिलेशी निवृत्त शिक्षकाने ही लग्नाची गाठ बांधली आहे.