Gunratna Sadavarte : गृहमंत्री आणि सुप्रिया सुळेंची लाय डिटेक्टर टेस्ट करा - सदावर्ते - Gunratna Sadavarte st worker protest
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मागील तीन महिन्यांपासून आझाद मैदानावर आंदोलन करणारे एसटी कर्मचारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या निवासस्थानी धडकले. मुंबईतील निवासस्थान असणाऱ्या सिल्व्हर ओकवर एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार आंदोलन ( ST Worker Protest Sharad Pawar House ) केले. कर्मचाऱ्यांनी पवारांच्या निवासस्थानावर चपला आणि बाटल्याही फेकल्या. त्यानंतर काही काळ परिसरातील वातावरण तापले होते. तर, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आता अॅड. गुणरत्न सदावर्ते ( Gunratna Sadavarte ) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला जर कोणी हल्ल्याचे स्वरूप देत असेल, तर त्यांची लाय डिटेक्टर टेस्ट घ्यावी. त्यामध्ये गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि खासदार सुप्रिया यांची देखील टेस्ट करण्यात यावी. जेणेकरुन आंदोलनामागे कोण आहे, हे जनतेला कळेल. मात्र, हा हल्ला नसून आंदोलन आहे, असेही सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST