अवर्णननीय, अफलातून, अद्भूत असा टोकियो ऑलिम्पिकचा सांगता सोहळा - पॅरिस ऑलिम्पिक 2020
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12720446-554-12720446-1628507478519.jpg)
टोकियो - कोरोना महामारीच्या आव्हानात देखील टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन यशस्वी राहिले. यंदाचा हा ऑलिम्पिक दुसऱ्या पेक्षा अधिक वेगळा राहिला. रविवारी या ऑलिम्पिकचा समारोप सोहळा पार पडला. यात रंगिबेरंगी रोषणाई करण्यात आली होती. खेळाच्या या महाकुंभात 205 देश, 33 खेळात, 339 इव्हेंट आणि 11 हजाराहून अधिक अॅथलिट सहभागी झाले होते. भारताने या ऑलिम्पिकसाठी सर्वात मोठा संघ पाठवला होता. यात भारतीय खेळाडू 18 क्रीडा इव्हेंटमध्ये सहभागी झाले होते. सर्व खेळाडूंनी आपला बेस्ट दिला. पुढील ऑलिम्पिक 2024 मध्ये पॅरिस येथे होणार आहे. पण टोकियो ऑलिम्पिकचा सांगता खास झाली. याचे वर्णन अवर्णननीय, अफलातून, अद्भूत असेच करता येईल. यात जपानच्या कलाकारांची खास अदाकारी पाहायला मिळाली.