ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना थकवणे ही आमची रणनीती होती - शार्दुल ठाकुर - Shardul Thakur on his 50
🎬 Watch Now: Feature Video
गाबा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारताच्या शार्दुल ठाकुर आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीने कमाल केली. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शार्दुल-वॉशिंग्टनने अर्धशतके झळकावत १२३ धावांची भागीदारी केली. दिवस संपल्यानंतर शार्दुलने आपल्या खेळीबाबत प्रतिक्रिया दिली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना थकवणे ही आमची रणनीती होती, असे शार्दुलने सांगितले.