भारतीय महिला हॉकी संघाने कापला केक, गायलं राष्ट्रगीत - महिला हॉकी
🎬 Watch Now: Feature Video
नई दिल्ली - टोकियो ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर भारतीय महिला हॉकी संघ मायदेशी परतला आहे. दिल्लीच्या अशोका हॉटेलमध्ये महिला हॉकी संघाने केप कापला आणि राष्ट्रगीत गायलं. महिला हॉकी संघ प्रथमच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत पोहोचला होता. परंतु त्यांचा पराभव झाला. त्यानंतर कास्य पदकाचा सामना देखील त्यांनी गमावला. ते चौथ्या स्थानावर राहिले. पण भारतीय महिला हॉकी संघाने आपल्या दमदार खेळीच्या जोरावर देशवासियांची मने जिंकली. दिल्लीच्या अशोका हॉटेलमध्ये महिला हॉकी संघातील खेळाडूंचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यात कर्णधार राणी रामपाल आणि गोलकिपर सविता पुनिया यांनी केक कापला. यानंतर सर्व खेळाडूंनी राष्ट्रगीत गायलं.