'गोल्डन गर्ल' अवनी लेखरा मोदींना म्हणाली, तुम्ही दिलेल्या सल्ल्यामुळे जिंकले पदक - टोकियो पॅरालिम्पिक
🎬 Watch Now: Feature Video
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भाग घेणाऱ्या भारतीय खेळाडूंशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी सुवर्ण पदक विजेती अवनी लेखरा हिने मोदींनी माझा विश्वाव वाढवल्याचे सांगितलं. ती म्हणाली, मी जेव्हा फायनलमध्ये पोहोचली. तेव्हा मोदी यांनी, तु तुझं सर्वोत्कृष्ठ प्रदर्शन कर, मानसिक दबाव घेऊ नकोस असा सल्ला दिला होता. मोदींचा सल्ला मी अंमलात आणला आणि मी पदक जिंकले. दरम्यान, अवनीने आपले दोन्ही पदक भारतीयांनी समर्पित केले. तिने टोकियोत महिला 10 मीटर एअर रायफल एसएच1 इव्हेंटमध्ये सुवर्ण पदक तर महिला 50 मीटर एअर रायफल 3 एसएच1 इव्हेंटमध्ये कास्य पदक जिंकलं आहे.