मेजर ध्यानचंद यांना 'भारतरत्न' द्या, ध्यानचंद यांच्या मुलाची मागणी - मेजर ध्यानचंद यांचा मुलगा
🎬 Watch Now: Feature Video
नई दिल्ली - भारतीय पुरूष हॉकी संघाने 41 वर्षानंतर इतिहास रचत टोकियो ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकलं. यानंतर हॉकी खेळ चर्चेत आला आहे. आज सकाळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून त्याचे नाव मेजर ध्यानचंद पुरस्कार असं केलं आहे. यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अशात मेजर ध्यानचंद यांचे सुपुत्र अशोक कुमार यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने बातचित केली. यात अशोक कुमार यांनी ध्यानचंद यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न' देण्याची मागणी केली. पाहा काय म्हणाले अशोक कुमार...